ठाणे - मनिषा भगत यांचा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
ठाणे , 19 डिसेंबर, (हिं.स.)। मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटाला जोरदार झटका दिला आहे. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्ष मनिषा भगत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह
ठाणे


ठाणे , 19 डिसेंबर, (हिं.स.)। मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटाला जोरदार झटका दिला आहे. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्ष मनिषा भगत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. मनोज प्रधान यांनी त्यांचे स्वागत केले.

मुंब्रा स्टेशन परिसरात सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या मनिषा भगत यांनी सन 2023 मध्ये अजित पवार गटात प्रवेश केला होता. सध्या त्या अजित पवार गटाच्या ठाणे महिला कार्याध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. आज त्यांनी शरद पवार यांची विचारधारा आणि डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

या प्रसंगी डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले, मनिषा भगत यांचा आपला जुना परिचय आहे. त्यांनी आमच्यासोबत कामही केले होते. आता त्यांनी विद्वेषाचे राजकारण सोडून आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय कौतुकास्पद आहे.

या प्रसंगी मनिषा भगत यांनी, डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व हे सर्वमान्य आहे. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनीच मुंब्रा परिसराचा विकास केला आहे. मात्र, काही लोक राजकारणासाठी या विकासात्मक कामांकडे पाहणे टाळत आहेत. ही बाब आपल्या मनाला पटत नसल्यानेच आपण विकासाच्या मार्गाने म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले.

यावेळेस शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष अभिजीत पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, सुरेंद्र उपाध्याय, संतोष तिवारी, राकेश भगत, मकसूद खान आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande