बीड जिल्ह्यात १३२३ पैकी ११७९ पोलिस पाटलांची पदे रिक्त
बीड, 18 डिसेंबर (हिं.स.)। बीड जिल्ह्यात १३२३ पोलिस पाटलांची पदे मंजूर आहेत. यातील केवळ १४४ कार्यरत असून तब्बल ११७९ पदे हे रिक्त आहेत. त्यामुळे गावपातळीवरील कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली अस
बीड जिल्ह्यात १३२३ पैकी ११७९ पोलिस पाटलांची पदे रिक्त


बीड, 18 डिसेंबर (हिं.स.)।

बीड जिल्ह्यात १३२३ पोलिस पाटलांची पदे मंजूर आहेत. यातील केवळ १४४ कार्यरत असून तब्बल ११७९ पदे हे रिक्त आहेत. त्यामुळे गावपातळीवरील कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली असून पोलिस असून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत. त्यासाठी ३० डिसेंबर रोजी गावनिहाय आरक्षण जाहीर होणार आहे.

जिल्ह्यात पोलिस पाटील यांची

एकूण मंजूर पदे १३२३ असून त्यापैकी केवळ १४४ पोलिस पाटील सध्या कार्यरत आहेत.

जिल्हाधिकारी यांनी पोलिस पाटील भरती प्रक्रियेअंतर्गत गावनिहाय आरक्षण निश्चितीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये १५ ते २० डिसेंबर रोजी गावनिहाय आरक्षण निश्चीत होणार आहे.

यामध्ये २२ ते २६ डिसेंबरदरम्यान आरक्षणावर आक्षेप मागवण्यात येणार असून, ३० डिसेंबर रोजी अंतिम गावनिहाय आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.

जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे वगावनिहाय आरक्षण निश्चितीः 20 डिसेंबर २०२५

आरक्षणावर आक्षेप मागवणेः २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२५ आक्षेपांवर निर्णय घेऊन अंतिम आरक्षण जाहीर : ३० डिसेंबर २०२५

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. आरक्षण सोडत निश्चित झाल्यानंतर दुसऱ्या टप्यात पोलिस पाटलांच्या भरतीचा कार्यक्रम जाहिर होईल. लवकरच जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे भरली जाणार आहेत

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande