चिपळूणचे ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद ऊर्फ भाऊ कार्ले यांना राष्ट्रीय समरसता पुरस्कार
रत्नागिरी, 18 डिसेंबर, (हिं. स.) : चिपळूणचे ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद मोरेश्वर कार्ले ऊर्फ भाऊ कार्ले यांना नाशिक येथील भावना बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय समरसता पुरस्कार नाशिक येथे प्रदान करण्यात आला. डॉ. भारतीताई प्रवीण पवार यांनी
भाऊ कार्ले


रत्नागिरी, 18 डिसेंबर, (हिं. स.) : चिपळूणचे ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद मोरेश्वर कार्ले ऊर्फ भाऊ कार्ले यांना नाशिक येथील भावना बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय समरसता पुरस्कार नाशिक येथे प्रदान करण्यात आला.

डॉ. भारतीताई प्रवीण पवार यांनी पुरस्कार प्रदान केला. श्री. कार्ले १९८२ पासून हौशी रंगभूमीवर कार्यरत असून त्यांना आजपर्यंत नाट्य, एकांकिका लेखन, दिग्दर्शन, सादरीकरण यामध्ये सुमारे तीनशे पारितोषिके मिळाली आहेत. त्यांनी सांस्कृतिक व समाज उन्नतीसाठी कनक, संघर्ष क्रीडामंडळ, प्रशांत दामले फॅन फॉउंडेशन, श्री दत्त देवस्थान-साखरपा यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक स्पर्धांचे, नाट्य शिबिरांचे नेटके आयोजन, नियोजन यशस्वीपणे केले आहे.

श्री. कार्ले यांच्या समाजाभिमुख कामांचा विचार करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची माहिती साहित्य भूषण महेश मुळे यांनी पुरस्कार वितरण समारंभात दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande