रत्नागिरी : माजी खासदार गोविंदराव निकम जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा
रत्नागिरी, 18 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरीचे माजी खासदार, सहकार व शिक्षण महर्षी गोविंदराव निकम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ७ जानेवार
रत्नागिरी : माजी खासदार गोविंदराव निकम जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा


रत्नागिरी, 18 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरीचे माजी खासदार, सहकार व शिक्षण महर्षी गोविंदराव निकम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डे, ता. चिपळूण येथे होणार आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी घरात हवेत आजी-आजोबा, सोशल मीडियाचे समाजावर होणारे परिणाम हे विषय आहेत.

वक्तृत्व स्पर्धा केवळ मराठी भाषेतच होईल. प्रत्येक स्पर्धकास आपले विचार मांडण्याकरिता ५+२ मिनिटांचा कालावधी असेल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुख्याध्यापकांच्या सहीसह प्रवेशिका जमा करणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी प्रवास खर्च स्वतः करावयाचा आहे. स्पर्धेसाठी एका शाळेतील केवळ दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी रसिका सुर्वे (८३६९७६२३९७), प्रणित राजेशिर्के ( ८४११०६६८७२) यांच्याशी संपर्क साधावा.

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धाही ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा, सावर्डे, ता. चिपळूण येथे होणार आहे. इतिहासातील स्त्री व आजची स्त्री, संगणक साक्षरता-काळाची गरज हे विषय आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धकांकडून निबंध लिहून घेतले जाणार आहेत. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. निबंध किमान २५० ते ३०० शब्दांचा असावा. स्पर्धेचा निकाल विजेत्यांना कळविण्यात येईल. एका शाळेतील कितीही विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी प्रणिता दिंडे (९०४९११५७६५), अक्षता घाग (९६८९७९२९३०) यांच्याशी संपर्क साधावा.

दोन्ही स्पर्धांसाठी अनुक्रमे ५०००/-,३०००/- आणि २०००/- रुपयांची रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्र दिली जातील. स्पर्धेचे बक्षीस वितरण १७ जानेवारी २०२६ रोजी गोविंदरावजी निकम यांच्या जयंती महोत्सव कार्यक्रमात गोविंदरावजी निकम यांच्या स्मारकस्थळी सावर्डे, ता. चिपळूण येथे होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande