माजलगाव येथील सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी यश खेचून आणले
बीड, 18 डिसेंबर (हिं.स.)। माजलगाव येथील सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या तीन विद्याथ्यांनी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेच्या पहिल्या फेरीत यश मिळवले. इयत्ता सहावीतील नयन सुरेश केज कदम, इयत्ता नववीतील आदित्य शिवानंद खुर्पे आणि कल्पेश कमलकि
माजलगाव येथील सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी यश खेचून आणले


बीड, 18 डिसेंबर (हिं.स.)।

माजलगाव येथील सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या तीन विद्याथ्यांनी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेच्या पहिल्या फेरीत यश मिळवले.

इयत्ता सहावीतील नयन सुरेश केज कदम, इयत्ता नववीतील आदित्य शिवानंद खुर्पे आणि कल्पेश कमलकिशोर लड्डा हे विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले. आणि कल्पेश

दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले.

या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रमुख नितीन सोनवणे, जया नागरगोजे, शरद पवार आणि विज्ञान विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा. चंद्रकांत मुळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश दुगड, अमरनाथ खुर्पे, शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, कार्यवाह अॅड. विश्वास जोशी, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष प्रशांत भानप यांनी अभिनंदन केले. मुख्याध्यापक संतोष लिंबकर, उपमुख्याध्यापक विवेक जोशी, पर्यवेक्षक रवींद्र खोडवे, सदाशिव ढगे, कमलाकर झोडगे, परमेश्वर आदमाने तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande