
नांदेड, 18 डिसेंबर (हिं.स.)।
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकी करिता काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवार (ता.१९) रोजी काँग्रेस कार्यालय नवा मोंढा येथे सकाळी ११ ते सायंकाळी ०७ वाजेदरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. अशी माहिती नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकी करिता काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आज शुक्रवार (ता.१९) रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी खा. डॉ. कल्याण काळे, खा. रवींद्र चव्हाण, दक्षिण जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि सर्व विभाग व सेल यांचे अध्यक्ष यांच्या विशेष उपस्थितीत मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी शहर व जिल्हा काँग्रेस कार्यालय येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळात उपस्थित रहावे असे आवाहन शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis