पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी भाजपा सज्ज
पुणे, 18 डिसेंबर (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली असून त्याचाच एक भाग म्हणजे शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात नुकत्याच पार पडल्या. इच्छुक उमेदवारांकडून आलेल्या
bjp


पुणे, 18 डिसेंबर (हिं.स.)।

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली असून त्याचाच एक भाग म्हणजे शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात नुकत्याच पार पडल्या. इच्छुक उमेदवारांकडून आलेल्या विक्रमी प्रतिसादामुळे भाजपची शहरातील ताकद आणि जनतेचा विश्वास स्पष्टपणे दिसून आला असल्याचे पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

पिंपरी मोरवाडी येथील भाजपा पक्ष कार्यालयामध्ये शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या. तब्बल 730 अर्ज इच्छुक उमेदवाराकडून पक्षाकडे सादर करण्यात आले होते. या सर्व इच्छुक उमेदवारांची मुलाखत पक्षाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, विधानपरिषद आमदार अमित गोरखे आणि उमा खापरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. महापालिका निवडणुकीसाठी तब्बल सातशेहून अधिक उमेदवारांनी उमेदवारीची मागणी केल्यामुळे भाजपमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या मुलाखत प्रक्रियेबाबत सांगताना निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले मुलाखती दरम्यान प्रत्येक इच्छुक उमेदवाराची वैयक्तिक ओळख , संबंधित प्रभागातील सद्यस्थिती, सामाजिक काम, संघटनात्मक अनुभव आणि राजकीय वाटचाल यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पक्षाने नेहमीच पारदर्शक प्रक्रिया आणि सक्षम नेतृत्वाला प्राधान्य दिले आहे. याबाबतचे स्पष्ट निकषच पक्षाने ठरवलेले आहेत आणि याच निकषांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande