सोलापूरात पोलिस अंमलदारास सायबर गुन्हेगारांनी घातला ३० लाखांचा गंडा!
सोलापूर, 18 डिसेंबर (हिं.स.)। शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा परतावा कमी दिवसांत मिळेल, असे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी एका पोलिस अंमलदारास ३० लाखांना फसविले. २०२४ मध्ये दाखल गुन्ह्यातील एका संशयितास सोलापूर सायबर पोलिसांनी जेरबंद केले
सोलापूरात पोलिस अंमलदारास सायबर गुन्हेगारांनी घातला ३० लाखांचा गंडा!


सोलापूर, 18 डिसेंबर (हिं.स.)।

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा परतावा कमी दिवसांत मिळेल, असे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी एका पोलिस अंमलदारास ३० लाखांना फसविले. २०२४ मध्ये दाखल गुन्ह्यातील एका संशयितास सोलापूर सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांना सापडू नये, म्हणून मूळचा तिरुअनंतपुरम येथील असतानाही तो गावापासून ३०० किमी दूर लॉजवर राहात होता.सैफूलजवळील उद्धव नगरात राहणाऱ्या पोलिस अंमलदारास सुनील त्रिवेदी याने मोबाईलवर https://www.alb.zone लिंक पाठवून ‘एएलबी’ या बनावट ट्रेंडीग ॲपवरून व्हॉट्‌सॲप ग्रुपमध्ये जॉईन केले. त्यात शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास काही दिवसात जास्त पैसे कमावू शकता, असे आमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी पोलिस अंमलदाराने सुरवातीला एक लाख रुपये गुंतवले. त्यानंतर लगेच त्यांना जादा पैसे परत मिळाले. पोलिस अंमलदाराचा विश्वास दृढ झाला आणि त्यांनी पाहुण्यांकडून, स्वत:कडील व मित्रांकडून उसने पैसे घेतले. बॅंकेतून १६ लाखांचे कर्ज देखील घेतले. एकूण ३० लाख ११ हजार १०० रुपये सायबर गुन्हेगारांनी सांगितल्याप्रमाणे त्या बॅंक खात्यावर पाठविले. आता पैसे काढून घेणार असल्याचे सांगितल्यावर सायबर गुन्हेगारांनी बनावट ॲपवरील फिर्यादीच्या अकाऊंटची माहिती डिलिट केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande