सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा २२ वा पदविदान समारंभ शनिवारी
पुणे, 18 डिसेंबर (हिं.स.)सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) चा २२ वा पदविदान समारंभ शनिवार २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे, पुणे कॅम्पस येथे संपन्न होणार आहे.भारत सरकारचे माननीय परराष्ट्र व्य
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा २२ वा पदविदान समारंभ शनिवारी


पुणे, 18 डिसेंबर (हिं.स.)सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) चा २२ वा पदविदान समारंभ शनिवार २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे, पुणे कॅम्पस येथे संपन्न होणार आहे.भारत सरकारचे माननीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, या पदविदान समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. शां. ब. मुजुमदार, संस्थापक आणि अध्यक्ष, सिंबायोसिस आणि कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.डॉ.विद्या येरवडेकर, प्र कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, डॉ. रामकृष्णन रमण कुलगुरू, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आदी इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande