उमेद पंख विश्वासाचे उपक्रमाचा थाटात शुभारंभ
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)।शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंती निमित्ताने उमेद पंख विश्वासाचे या उपक्रमास थाटात सुरुवात झाली असून विनामूल्य जयपुर फूट मिळवण्यासाठी दिव्यांग बांधव भगिनींनी आज मोठी गर्दी केली.श्री
उमेद पंख विश्वासाचे उपक्रमाचा थाटात शुभारंभ जयपुर फुट वाटपाच्या विक्रमी कार्यक्रमात दिव्यांगाची मोठी गर्दी


अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)।शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंती निमित्ताने उमेद पंख विश्वासाचे या उपक्रमास थाटात सुरुवात झाली असून विनामूल्य जयपुर फूट मिळवण्यासाठी दिव्यांग बांधव भगिनींनी आज मोठी गर्दी केली.श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विशेष पुढाकारातून डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, आर्किटेक रामेश्वर मनियार,अंबादास खोब्रागडे आर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 18 डिसेंबर पासून विनामूल्य जयपूर फूट कृत्रिम अवयव (अंगरोपण) वाटपाचा कार्यक्रम डॉ.पंजाबराव देशमुख स्मृति वैद्यकीय महाविद्यालय पंचवटी येथे आयोजित करण्यात आला आहे. कृत्रिम अवयव मिळविण्यासाठी व मोजमाप देण्यासाठी 800 दिव्यांग बांधवांनी नोंदणी केली आहे. या उपक्रमाचे बापूसाहेब देशमुख नागरवाडी यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन झाले. या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षखाली संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ.प्रवीण तायडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, संस्थेचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील पुसदेकर, कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्रा.सुभाषराव बनसोड प्राचार्य अंबादास कुलट,प्राचार्य अमोल महल्ले आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकार रजनी अंबादे, संदीपजी पुंडकर, प्रभुजितसिंह बच्छर, संत गाडगेबाबा धर्मशाळा ट्रस्ट दादरचे विश्वस्त प्रशांतराव देशमुख,भरतराव रेडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, किशोर मालोकर रामेश्वर मनियार यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणातून हर्षवर्धन देशमुख यांनी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले जावे अशी इच्छा व्यक्त करून लोक कल्याणाची संधी मिळाली तर जेवढे देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न करावा चांगल्या योजनेसाठी आम्ही सदैव सहकार्य करत राहू असे आश्वासन दिले. तसेच हेमंत काळमेघ यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले त्यामुळे ते देखील कौतुकास पात्र असल्याचे हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले.यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी संजिता महापात्र, यांनी दिव्यांग बांधवांसाठी आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम असून या माध्यमातून मोठे सहकार्य लाभेल.विविध शासकीय योजना देखील दिव्यांगासाठी आहेत,सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था यांच्या पुढाकारातून असे उपक्रम राबविण्यात मदत होते.त्यामुळे भविष्यात शासकीय योजना राबविण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची गरज भासेल. भविष्यात संयुक्त विद्यमाने उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली.यावेळी आमदार प्रवीण तायडे यांनी देखील विचार व्यक्त केले. तसेच रजनी अंबादे,किशोर मालोकर, रामेश्वर मणियार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ.ए.टी. देशमुख संचालन किशोर इंगळे व आभार प्रदर्शन संदीप पुंडकर यांनी केले. यावेळी पंजाबराव देशमुख अर्बन बँकेचे अध्यक्ष नरेश पाटील,आजीवन सभासद बबनराव चौधरी, डॉ.बोदडे, नरेंद्र लढ्ढा, प्रवीण रघुवंशी, भैय्यासाहेब मेटकर, पद्माकर सोमवंशी,प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख,प्राचार्य डॉ स्मिता देशमुख यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande