त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामास मिळणार गती
त्र्यंबकेश्वर , 18 डिसेंबर (हिं.स.)। आगामी सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने व्हीआयएल कंपनीने त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त कुंडाच्या जल शुद्धीकरण व पुनरुज्जीवनासाठी सीएसआर उपक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण प्रकल्पाची तयारी केली असून संबंधित काम तात्काळ
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामास मिळणार गती , संपूर्ण कुंड तीन तासात होणार स्वच्छ  - कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह


त्र्यंबकेश्वर , 18 डिसेंबर (हिं.स.)।

आगामी सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने व्हीआयएल कंपनीने त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त कुंडाच्या जल शुद्धीकरण व पुनरुज्जीवनासाठी सीएसआर उपक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण प्रकल्पाची तयारी केली असून संबंधित काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.

त्र्यंबकेश्वरला वर्षभरात लाखो भाविक येतात. गर्दीच्या काळात कुंडातील पाण्याची गुणवत्ता झपाट्याने खराब होते. आरोग्याच्या दृष्टीने विद्यमान 100 m³/hr ऐवजी प्रस्तावित 300 m3 /hr क्षमतेच्या उपचार सयंत्रामुळे संपूर्ण कुंड आता 9 तासाऐवजी 3 तासात स्वच्छ करता येणे शक्य होणार आहे. पाण्याची गुणवत्ता आवास व शहरी कार्य मंत्रालय व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सातत्याने टिकवता येणार आहे. तसेच 25 वर्षांची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी व्हीआयएल कंपनीची राहणार आहे. 15 डिसेंबर 2025 रोजी व्हीआयएलने सादर केलेल्या सादरीकरणात तांत्रिक तपशील, क्षमतावाढ, उपचार पद्धती आणि अंमलबजावणी रूपरेषा स्पष्ट करण्यात आली आहे.

प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी नगर परिषदेकडून साइट हस्तांतरण, वीजपुरवठा आणि संबंधित परवानग्यांची प्रक्रिया जलदगतीने केली जाणार आहे. या अनुषंगाने प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीवर चर्चा करण्यासाठी 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता दुरदृष्यप्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

या प्रकल्पाचे काम जुनअखेर पुर्ण होणे अपेक्षित असून यामुळे कुशावर्त कुंडातील पाणी आरोग्याच्या दृष्टीने सतत स्नानयोग्य दर्जाचे राहील आणि तीर्थक्षेत्रातील स्वच्छता राखली जाणार असल्याचेही आयुक्त श्री. सिंह यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande