
पुणे, 18 डिसेंबर, (हिं.स.)
पीएमपी प्रशासनाने २५ डबलडेकर बसची निविदा काढली आहे. भाडेतत्त्वावरील या बस पूर्णतः इलेक्ट्रिक व वातानुकूलित असतील. काही दिवसांपूर्वी पुण्यातील विविध भागांत या बसची चाचणी झाली होती. ती यशस्वी झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. एप्रिल-मे महिन्यात म्हणजेच येत्या उन्हाळ्यात पुणेकरांना डबलडेकरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.गेल्या ३० वर्षांपासून पुणेकरांच्या आठवणीमध्ये असलेली डबलडेकर बस आता नव्या रूपात व नव्या ढंगात पुन्हा एकदा रस्त्यांवर धावणार आहे.
स्वीच कंपनीच्या या बसची काही दिवसांपूर्वी पुण्यातील विविध भागांत चाचणी झाली. त्यानंतर पीएमपी प्रशासनाने निविदा प्रसिद्ध केली आहे.पहिल्या टप्प्यात २५ बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होत आहे. चेन्नई येथे स्वीच कंपनीच्या बसचे उत्पादन होते. तेथून या बस पुण्यात दाखल होणार आहेत. यापूर्वी १९९५ मध्ये पुण्यात डबलडेकर बस धावल्या होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु