अमरावती महानगरपालिका आयुक्तांची बडनेरा झोन कार्यालयाची सविस्तर पाहणी
अमरावती, 19 डिसेंबर, (हिं.स.)। अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बडनेरा झोन कार्यालयाची सविस्तर पाहणी केली. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीतपणे पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून सुरू
अमरावती महानगरपालिका आयुक्तांची बडनेरा झोन कार्यालयास सविस्तर पाहणी


अमरावती, 19 डिसेंबर, (हिं.स.)। अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बडनेरा झोन कार्यालयाची सविस्तर पाहणी केली. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीतपणे पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या नियोजनाचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला.

या पाहणीदरम्यान आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी बडनेरा प्रभागातील सर्व मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मतदान केंद्रांवरील स्वच्छता, पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, रॅम्प, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा तसेच सुरक्षा व्यवस्थेची योग्य आखणी करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.निवडणूक काळात कोणतीही गैरसोय अथवा त्रुटी राहू नये, यासाठी पूर्वनियोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत आयुक्तांनी सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मतदान केंद्रांची यादी, मनुष्यबळ नियोजन, वाहतूक व्यवस्था, साहित्य उपलब्धता तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्जता ठेवण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

बडनेरा झोनमध्ये निवडणूक प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केले. प्रशासन, पोलीस यंत्रणा व इतर संबंधित विभागांमध्ये योग्य समन्वय ठेवून नागरिकांचा विश्वास टिकवणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणी दरम्‍यान बडनेरा झोनचे अधिकारी, कर्मचारी तसेच निवडणूक नियोजनाशी संबंधित विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अमरावती महानगरपालिकेने निवडणूक तयारीला गती दिल्याने आगामी निवडणुका यशस्वीपणे पार पडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या पाहणी दरम्‍यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी विवेक जाधव दक्षिण झोन क्र.४ बडनेरा, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी क्र.१ श्रीमती निकीता जावरकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी क्र.२ तथा सहाय्यक आयुक्‍त धनंजय शिंदे मनपा दक्षिण झोन क्र.४ बडनेरा, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी क्र.३ तथा सहाय्यक अभियंता श्रीरंग तायडे, सहाय्यक आयुक्‍त तथा जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande