अंबाजोगाईच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी; आ. मुंदडा यांनी केले कौतुक
बीड, 19 डिसेंबर (हिं.स.)। मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे सिंधुदुर्ग व महाराष्ट्र जलतरण संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५ व्या राज्यस्तरीय खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत अवघ्या आठ वर्षांची दिव्यांग जलतरणपटू कु. स्वरा लक्ष्मीकांत चाटे हिने १ किलोमीट
बीड


बीड, 19 डिसेंबर (हिं.स.)। मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे सिंधुदुर्ग व महाराष्ट्र जलतरण संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५ व्या राज्यस्तरीय खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत अवघ्या आठ वर्षांची दिव्यांग जलतरणपटू कु. स्वरा लक्ष्मीकांत चाटे हिने १ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत तृतीय क्रमांक पटकावत ब्रॉन्झ पदकाची कमाई केली.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी कौतुक केले आहे त्या म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी गावची रहिवासी असलेली स्वरा हिची ही पहिलीच सागरी जलतरण स्पर्धा असून, कठीण सागरी परिस्थितीत दाखवलेल्या जिद्द, धैर्य आणि आत्मविश्वासामुळे तिच्या या यशाने संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. स्वराच्या हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.!

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande