छ. संभाजीनगर - ठाकरे गटाच्या ‌पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
छत्रपती संभाजीनगर, 19 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर येथील शिवसेना उबाठा गटाच्या ‌ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेना उबाठा गटाचे बेगमपुरा प्रभागातील माजी नगरस
शिवसेना उबाठा गटाच्या ‌ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी


छत्रपती संभाजीनगर, 19 डिसेंबर (हिं.स.)।

छत्रपती संभाजी नगर येथील

शिवसेना उबाठा गटाच्या ‌ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

शिवसेना उबाठा गटाचे बेगमपुरा प्रभागातील माजी नगरसेवक श्री.विनायक उर्फ गणू पांडे यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह चिकलठाणा येथील विभागीय कार्यालयात भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

यामध्ये श्री.विनायक उर्फ गणू पांडे यांच्यासह श्री.संजय फत्तेलष्कर, श्री.नंदकुमार जोशी, श्री.विजय सोनटक्के, श्री.अनिरुद्ध पांडे, श्री.युवराज डोंगरे, श्री.शाम शुक्ला, श्री.गणेश जोबले, श्री.बजरंग पठारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

यावेळी आमदार श्री.संजय केणेकर, शहर जिल्हाध्यक्ष श्री.किशोर शितोळे, निवडणूक प्रमुख श्री.समीर राजुरकर आणि मंडळ अध्यक्ष श्री.अमोल झळके यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande