नांदेड जिल्ह्यातील मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधीत आदेश
नांदेड, 19 डिसेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्‍ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत धर्माबाद, कुंडलवाडी, मुखेड, भोकर, किनवट, लोहा मतदानाच्या दिवशी शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी निवडणूकीची सर्व प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीको
नांदेड जिल्ह्यातील मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधीत आदेश


नांदेड, 19 डिसेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्‍ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत धर्माबाद, कुंडलवाडी, मुखेड, भोकर, किनवट, लोहा मतदानाच्या दिवशी शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी निवडणूकीची सर्व प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे सर्व मतदान केंद्र परिसरात 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेशास प्रतिबंधीत करण्‍यात येत आहे.

याबाबतचा आदेश भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्‍वये जिल्‍हादंडाधिकारी राहूल कर्डिले यांनी निर्गमीत केला आहे. हा आदेश नांदेड जिल्‍ह्यातील नप/नपं- धर्माबाद, कुंडलवाडी, मुखेड, भोकर, किनवट, लोहा निवडणूक 2025 च्‍या अनुषंगाने मतमोजणीच्या दिवशी शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान सुरु झाल्यापासून ते मतदान संपेपर्यन्‍त अंमलात राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande