छत्तीसगड सीमेवरील 'तुमरकोठी' येथे केवळ २४ तासांत नवे पोलीस स्टेशन सज्ज
गडचिरोली, 19 डिसेंबर (हिं.स.) माओवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी आणि अति-दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. उपविभाग हेडरी अंतर्गत, छत्तीसगड सीमेपासून
तुमरकोठी पोलीस स्टेशन2


गडचिरोली, 19 डिसेंबर (हिं.स.)

माओवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी आणि अति-दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. उपविभाग हेडरी अंतर्गत, छत्तीसगड सीमेपासून अवघ्या २ किमी अंतरावर असलेल्या 'तुमरकोठी' येथे आज नवीन पोलीस स्टेशनचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, १००० हून अधिक जवानांच्या साह्याने हे पोलीस केंद्र अवघ्या २४ तासांत उभारून पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेचा परिचय दिला आहे.बलाढ्य फौजफाटा आणि वेगवान कामया पोलीस स्टेशनच्या उभारणीसाठी १००० सी-६० कमांडो, २१ बीडीडीएस टीम, एसआरपीएफ आणि सीआरपीएफचे जवान अशा एकूण १०५० जणांचा ताफा तैनात होता. ४ जेसीबी, २ पोकलेन आणि २५ ट्रकच्या मदतीने युद्धपातळीवर काम करून एका दिवसात हे केंद्र उभे राहिले. येथे जवानांसाठी १२ पोर्टा कॅबिन, वायफाय सुविधा, आर.ओ. प्लांट, जनरेटर शेड आणि सुरक्षेसाठी अत्याधुनिक 'मॅक वॉल' व मोर्चे बांधण्यात आले आहेत.

सुरक्षेची नववी कडी

सन २०२३ पासून गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पोकळी भरून काढण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या मोहिमेतील हे ९ वे नवीन पोलीस स्टेशन आहे. यापूर्वी पेनगुंडा, नेलगुंडा, कवंडे आणि फुलनार येथे पोलीस केंद्रे स्थापन करून नक्षलग्रस्त भागात सुरक्षेचे जाळे भक्कम करण्यात आले आहे.लोकसंवाद आणि जनहितैषी उपक्रमउद्घाटनानंतर आयोजित 'जनजागरण मेळाव्यात' उपस्थित शेकडो ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. महिलांना साड्या व भांडी, पुरुषांना ब्लँकेट व शेती उपयोगी साहित्य, तर तरुणांना शैक्षणिक साहित्य आणि खेळाचे किट देण्यात आले. पोलीस स्टेशनच्या स्थापनेमुळे या भागात लवकरच नवीन रस्ते आणि एसटी बस सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तुमरकोठी पोलीस स्टेशनची स्थापना या भागाच्या सुरक्षेसाठी आणि स्थानिक नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. यामुळे दुर्गम भागातील विकासाला गती मिळेल.

— श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली.

मान्यवरांची उपस्थितीया सोहळ्याला अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक श्री. अंकित गोयल, सीआरपीएफचे उप-महानिरीक्षक श्री. अजय कुमार शर्मा, कमांडंट सत्य प्रकाश यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande