
नवी दिल्ली, 19 डिसेंबर (हिं.स.) : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची स्थानांतरण याचिका दिल्लीच्या रॉऊज ऍव्हेन्यू न्यायालयाने नाकारली. या याचिकेत त्यांनी आयआरसीटीसी हॉटेल घोटाळासह त्यांच्यावर चालू असलेल्या प्रकरणांना दुसऱ्या न्यायालयात पाठवण्याची मागणी केली होती.
याप्रकरणी सीबीआयने या याचिकेचा विरोध करत म्हटले की, ही याचिका न्यायप्रक्रियेवर परिणाम करणारी आणि न्यायाधीशांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करणारी आहे. हा फोरम शॉपिंगचा प्रकार आहे. (कायदेशीर प्रकरणात सर्वात अनुकूल निकाल मिळवण्यासाठी विशिष्ट न्यायालयाची निवड करणे.) रॉऊज ऍव्हेन्यू कोर्टाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात, आयआरसीटीसी हॉटेल घोटाळा आणि अन्य 4 प्रकरणांसंदर्भात राबड़ी देवींनी केलेली स्थानांतरणाची याचिका नाकारली गेली. राबड़ी यांनी दाखल केलेल्या याचिकेत विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांच्या न्यायालयापुढे सुरू असलेल्या प्रकरणांना दुसऱ्या न्यायालयात हलवण्याची मागणी केली होती.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी