अभ्यास करून तातडीने भूकंप मापक यंत्र बसवणार; आंदोलनानंतर तहसीलदारांचे लेखी पत्र
अमरावती, 19 डिसेंबर, (हिं.स.) - शिवणगाव, शिरजगाव, शेंदोळा या गावात भूकंप सदृश्य धक्के येत असल्याने तातडीने भूकंप मापक यंत्र बसवण्याची मागणी केली होती. २६ नोव्हेंबर रोजी जिवॉलॉजिकल पथक शिवणगावात येऊन थातुरमातूर तपासणी करून भूकंप मापक यंत्र बसवण्याचे
भूभागाचा अभ्यास करून तातडीने भूकंप मापक यंत्र बसवणार  सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या ठिय्या आंदोलनानंतर तहसीलदारांचे लेखी पत्र


अमरावती, 19 डिसेंबर, (हिं.स.) - शिवणगाव, शिरजगाव, शेंदोळा या गावात भूकंप सदृश्य धक्के येत असल्याने तातडीने भूकंप मापक यंत्र बसवण्याची मागणी केली होती. २६ नोव्हेंबर रोजी जिवॉलॉजिकल पथक शिवणगावात येऊन थातुरमातूर तपासणी करून भूकंप मापक यंत्र बसवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, २३ दिवसानंतरही त्याची पूर्तता झाली नसल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वात तिवसा तहसीलदार यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान चार तास ठिय्या मांडल्यानंतर शिवणगाव येथील भुभागाचा अभ्यास करून जीएसआय विभाग भूकंप मापक यंत्र बसवण्यासाठी केंद्र सरकारची मान्यता मिळताच यंत्र तत्काळ बसवण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन तहसीलदार मयूर कळसे यांनी दिले आहे.

दुपारी १२.३० वाजता सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनानंतर तहसीलदार कळसे यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन संबंधित ठिय्या आंदोलनाची माहिती दिली. दरम्यान शिवनगाव आणि आजूबाजूच्या शिवारात येत असलेल्या भूकंप सदृश्य धक्यांमुळे स्थानिक नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याची माहिती दिली. शिवाय, स्थानिक नागरिकांकडून तातडीने भूकंप मापक यंत्र बसवण्याच्या मागणीला वेग आल्याचेही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यादरम्यान तहसीलदार कळसे आणि प्रशांत कांबळे यांच्यात फोनद्वारे चर्चा झाल्यानंतर लेखी आश्वासन दिल्याशिवाय ठिय्या आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा इशारा दिला होता.त्यामुळे तहसीलदार कळसे यांनी लेखी आश्वासन दिले आहे. ज्यामध्ये २६ नोव्हेंबर रोजी जीएसआय पथकाने शिवणगाव येथील भूभागाची पाहणी केली असून, त्यासबंधित अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुन्हा नव्याने जीएसआय पथकाकडून शिवणगाव येथील जमिनीत खोदकाम करून जमिनीतील मातीचे नमुने आणि परीक्षण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. शिवाय, यंत्र बसवण्यासंदर्भात केंद्र सरकारची परवानगी लागत असल्याने परवानगी मागण्यात आली असून, परवानगी मिळताच यंत्र बसवण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने अखेर प्रशांत कांबळे यांनी ठिय्या आंदोलनातून माघार घेतली आहे. यावेळी शिवणगाव सरपंच धर्मराज खडसे, महादेव अंबूलकर, कैलास कठाळे, चंद्रवदन खोब्रागडे, नरेश साबळे, रमेश डेहनकर, जसबीर ठाकूर, प्रशांत प्रधान, शरद धसकट, स्वप्नील निस्ताने, एड. विकास तुरकाने, प्रकाश चिचखेडे, राहुल येरणे, सुधाकर तुरकाने यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande