बीड - शेतमाल दरवाढीसाठी २५ डिसेंबरला शेतकरी हक्क मोर्चा
बीड, 20 डिसेंबर, (हिं.स.)। तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश मुळुकवाडी येथील शेतकऱ्यांनी २५ डिसेंबर (गुरुवार) रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय, बीड या दरम्यान मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला. बीड जिल्ह्यातील कोरडवाह
बीड - शेतमाल दरवाढीसाठी २५ डिसेंबरला शेतकरी हक्क मोर्चा


बीड, 20 डिसेंबर, (हिं.स.)। तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश मुळुकवाडी येथील शेतकऱ्यांनी २५ डिसेंबर (गुरुवार) रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय, बीड या दरम्यान मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला.

बीड जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकरी कापूस, सोयाबीन व तूर व तूर या प्रमुख पिकांना योग्य दर न मिळाल्यामुळे तीव्र आर्थिक संकटात सापडला आहे. कापूस खरेदी केंद्रांवर सीसीआयकडून होणारी पिळवणूक तसेच सोयाबीन खरेदी केंद्रांवरील सरसकट अन्याय सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला. या अन्यायाविरुद्ध शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मुळुकवाडी येथे शेतकरी जागृती अभियान अंतर्गत

बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande