राजधानी एक्सप्रेसची धडक; अनेक हत्ती ठार, 5 डबे रुळावरून घसरले
होजाई (आसाम), 20 डिसेंबर (हिं.स.) । आसामच्या लुमडिंग विभागात सैरांग–नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसची आज, शनिवारी हत्तीच्या कळपाला धडक बसून अपघात घडला. यात इंजिनसह ट्रेनचे 5 डबे रुळावरून घसरले. यात अनेक हत्तींचा मृत्यू झाला असून, सुदैवाने कोणताही प्
संग्रहित


होजाई (आसाम), 20 डिसेंबर (हिं.स.) । आसामच्या लुमडिंग विभागात सैरांग–नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसची आज, शनिवारी हत्तीच्या कळपाला धडक बसून अपघात घडला. यात इंजिनसह ट्रेनचे 5 डबे रुळावरून घसरले. यात अनेक हत्तींचा मृत्यू झाला असून, सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. या घटनेमुळे अपर आसाम आणि ईशान्य भारतातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वेकडून बचाव व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आसामच्या होजाई जिल्ह्यात शनिवारी पहाटे हा दुर्दैवी अपघात घडला. सैरांग–नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस जंगली हत्तींच्या कळपाशी धडकल्याने धडकेचा जोर इतका होता की ट्रेनचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले. वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या अपघातात 8 हत्ती ठार झाले.या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी प्रवाशांमध्ये झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, या अपघातामुळे अपर आसाम आणि ईशान्य भारतातील रेल्वे वाहतूक तात्पुरती ठप्प झाली आहे. रेल्वे प्रशासनाने बचावकार्य सुरू केले असून प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे, जेणेकरून त्यांचा पुढील प्रवास सुरक्षितपणे होऊ शकेल.

ही रेल्वे दुर्घटना ईशान्य सीमांत रेल्वे (एनएफआर)च्या लुमडिंग विभागातील जमुनामुख–कामपूर विभागात घडली. शनिवारी सकाळी राजधानी एक्सप्रेस जंगली हत्तींच्या कळपाशी धडकल्यानंतर ट्रेन रुळावरून घसरली. अपघातस्थळ गुवाहाटीपासून सुमारे १२६ किलोमीटर अंतरावर आहे. घटनेनंतर तात्काळ मदतगाड्या आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व बचाव अभियान सुरू करण्यात आले. डबे रुळावरून घसरल्याने आणि अपघातस्थळी अडथळे निर्माण झाल्याने रेल्वे सेवा प्रभावित झाली.एनडीटीबीच्या अहवालानुसार, प्रभावित डब्यांतील प्रवाशांना तात्पुरते इतर डब्यांतील उपलब्ध रिकाम्या बर्थवर बसवण्यात येणार आहे. गुवाहाटी येथे पोहोचल्यानंतर ट्रेनमध्ये अतिरिक्त डबे जोडण्यात येतील, जेणेकरून सर्व प्रवाशांना आसन व्यवस्था मिळेल आणि त्यानंतर ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना होईल.

ईशान्य सीमांत रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कपिंजल किशोर शर्मा यांनी सांगितले की, मालीगाव (आसाम) येथे पहाटे सुमारे 2.17 वाजता, एनएफ रेल्वेच्या लुमडिंग विभागातील जमुनामुख–कामपूर सेक्शनमध्ये ट्रेन क्रमांक 20507 (डीएन) सैरांग–नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस हत्तींच्या कळपाशी धडकली. या अपघातात लोकोमोटिव्ह आणि पाच डबे रुळावरून घसरले. कोणताही प्रवासी मृत्युमुखी पडलेला नाही किंवा जखमी झालेला नाही. लोको पायलटने तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावून ट्रेन थांबवली. दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असून कोणतीही मानवी हानी झालेली नाही.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande