बीड : थंडीचा कडाका वाढला; तापमान गेले ९ अंशांवर
बीड, 20 डिसेंबर, (हिं.स.)। डिसेंबरच्या सुरुवातीपासून बीड जिल्ह्यात थंडीने जोर धरला आहे. गेल्या १५ दिवसांत तापमान झपाट्याने घसरले. किमान तापमान ९ अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे जिल्ह्यात गारठा वाढला असून किमान तापमान ९ अंशावर खाली आले. तर २४ डिसेंब
बीड : थंडीचा कडाका वाढला; तापमान गेले ९ अंशांवर


बीड, 20 डिसेंबर, (हिं.स.)। डिसेंबरच्या सुरुवातीपासून बीड जिल्ह्यात थंडीने जोर धरला आहे. गेल्या १५ दिवसांत तापमान झपाट्याने घसरले. किमान तापमान ९ अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे जिल्ह्यात गारठा वाढला असून किमान तापमान ९ अंशावर खाली आले. तर २४ डिसेंबर पर्यंत १२ अंशापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतातील बर्फवृष्टी आणि थंड वाऱ्यांमुळे मराठवाड्यात थंडी वाढली आहे. बीड जिल्ह्यातही थंडीचे प्रमाण वाढले आहे. आकाश निरभ्र राहिल्याने थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. तापमानात थोडी वाढ झाली होती. त्यानंतर पुन्हा थंडीने जोर धरला. पहाटेच्या वेळी थंडीचा जोर अधिक जाणवत आहे. दुपारी उन्हाचा चटका आणि रात्री कडाक्याची थंडी असे हवामान अनुभवले जात आहे. थंडीचा फायदा रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांना होणार आहे. मात्र, रात्री पाणी देताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. परिणामी थंडीमुळे सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्णांध्ये वाढ होत आहे. हवामान विभागाने पुढील आठवड्यात थंडी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. किमान तापमान १० अंशांखाली जाण्याची शक्यता व्यक्त आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande