सोलपूर - आता विवाहासाठी दिव्यांगांना मिळणार दीड लाख रुपये
सोलापूर, 20 डिसेंबर, (हिं.स.)। दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी, दिव्यांग आत्मनिर्भर बनावा, विवाहापासून दिव्यांग वंचित राहू नये, यासाठी आता दिव्यांगांना विवाहासाठी शासनाकडून अडीच लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यात पती-पत
सोलपूर - आता विवाहासाठी दिव्यांगांना मिळणार दीड लाख रुपये


सोलापूर, 20 डिसेंबर, (हिं.स.)। दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी, दिव्यांग आत्मनिर्भर बनावा, विवाहापासून दिव्यांग वंचित राहू नये, यासाठी आता दिव्यांगांना विवाहासाठी शासनाकडून अडीच लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यात पती-पत्नीपैकी एकजण दिव्यांग असल्यास त्यांना दीड लाख रुपये तर दोघेही दिव्यांग असल्यास अडीच लाख रुपये मिळणार आहेत.

दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाकडून दिव्यांग व्यक्तीच्या विवाहाचा सहज स्वीकार, त्यामुळे त्यांना प्राप्त होणारे कौटुंबिक, भावनिक, मानसिक, सामाजिक स्थैर्य विचारात घेऊन दिव्यांगांच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने दिव्यांग- अव्यंग विवाह प्रोत्साहन अनुदान योजना सुरू केली आहे. दिव्यांगांना समाजात स्वतंत्रपणे राहता यावे, त्यांना राहणीमानाचा दर्जा मिळावा, त्यांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे यासाठी ही योजना आहे. वविवाहित दिव्यांग लाभार्थीने आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयाकडे अर्ज करावा. कार्यालयाकडून अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थींचे प्रस्ताव जिल्हा निवड समितीकडे मान्यतेसाठी पाठविले जातील. साेलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, समाजकल्याण सहायक आयुक्त व दिव्यांग कल्याण अधिकाऱ्यांची समिती त्या प्रस्तावास मंजुरी देईल. त्यानंतर लाभार्थीच्या खात्यात लाभ जमा होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande