लाडक्या बहिणींना १४ जानेवारीपूर्वी मिळणार ४५०० रुपये
सोलापूर, 20 डिसेंबर (हिं.स.)। सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरु असून डिसेंबरअखेर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार आहे. आता मकर संक्रातीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते म्हणजेच ४५०० रुपये मिळणार
लाडक्या बहिणींना १४ जानेवारीपूर्वी मिळणार ४५०० रुपये


सोलापूर, 20 डिसेंबर (हिं.स.)।

सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरु असून डिसेंबरअखेर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार आहे. आता मकर संक्रातीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते म्हणजेच ४५०० रुपये मिळणार आहेत. त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे. तसेच मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते (३००० रुपये) देण्याचेही नियोजन सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंतच्या मुदतीत अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले होते. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख नऊ हजार महिला होत्या. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी सर्व अर्जांची पडताळणी अशक्य होती. त्यामुळे कागदपत्रांच्या आधारावर पात्र लाडक्या बहिणींना सुरवातीला लाभ देण्यात आला. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यासाठी दरमहा १६६ कोटी ३५ लाखांचा निधी लागत होता. निकषांनुसार झालेल्या पडताळणीत सोलापूर शहर-जिल्ह्यातील दोन लाख लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा लाभ ३० कोटींनी कमी झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande