नांदेड जिल्ह्यात शस्त्र परवाना नुतीनकरण करुन घेण्याचे आवाहन
नांदेड, 20 डिसेंबर (हिं.स.)।नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयामार्फत निर्गमित, अभिलेखात नोंद असलेले शस्त्रपरवाने ज्याची मुदत बुधवार 31 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात येत आहे अशा शस्त्र परवानाधारकांनी त्यांचा शस्त्र परवाना पुढील
नांदेड जिल्ह्यात शस्त्र परवाना नुतीनकरण करुन घेण्याचे आवाहन


नांदेड, 20 डिसेंबर (हिं.स.)।नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयामार्फत निर्गमित, अभिलेखात नोंद असलेले शस्त्रपरवाने ज्याची मुदत बुधवार 31 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात येत आहे अशा शस्त्र परवानाधारकांनी त्यांचा शस्त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

परवानाधारकाने पुढील कालावधीत आपला शस्त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्यासाठी नियमानुसार असलेले नुतनीकरण शुल्क (चलनाने) शासनास जमा करावे. आपले शस्त्रपरवान्यात नमुद असलेल्या अग्निशस्त्राची पडताळणी या कार्यालयात करुन विहित नमुन्यातील अर्ज, जन्म तारखेचा पुरावा, पॅनकार्ड, आधार कार्ड, एक पासपोर्टफोटो व मुळ शस्त्रपरवाना जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड येथे मंगळवार 23 डिसेंबर 2025 पासून संबंधित विभागात दाखल करावा. नांदेड जिल्हयातील शस्त्र परवाना धारक व सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande