
पुणे, 20 डिसेंबर (हिं.स.)। मुंबईत रविवारी रेल्वे प्रशासनाने विविध कारणांसाठी ब्लॉक घेतला आहे. त्याचा परिणाम पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे. १३ मेल एक्स्प्रेस गाड्यांना कल्याण व ठाणे स्थानकादरम्यान उशीर होणार आहे. परिणामी, या गाड्यांना मुंबई गाठण्यासाठी किमान १५ मिनिटांचा उशीर होईल, असे प्रशासनाने जाहीर केले.
या गाड्यांचा समावेश : - पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्स्प्रेस, नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस, पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, राजगीर-लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्स्प्रेस, काकीनाडा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्स्प्रेस, नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्स्प्रेस, चेन्नई-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेस, बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल, हाटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, कोइंबतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु