बीड - पाटोद्यातील १९ अंगणवाड्यांचा कायापालट होणार
बीड, 20 डिसेंबर, (हिं.स) बीड जिल्ह्यातील पाटोदा शहरातील १९ अंगणवाड्यांच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन केले जात आहे. आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून शहरातील अंगणवाड्यांचा कायपालट केला जाणार आहे. पाटोदा शहरातील १९ अंगणवाड्यांमध्ये असलेल्या विविध प्र
बीड - पाटोद्यातील १९ अंगणवाड्यांचा कायापालट होणार


बीड, 20 डिसेंबर, (हिं.स) बीड जिल्ह्यातील पाटोदा शहरातील १९ अंगणवाड्यांच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन केले जात आहे. आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून शहरातील अंगणवाड्यांचा कायपालट केला जाणार आहे. पाटोदा शहरातील १९ अंगणवाड्यांमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्याच प्रमाणे विविध प्रकारच्या विकास कामांवर चर्चा करण्यासाठी नगर पंचायत पदाधिकारी व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे संयुक्त चर्चासत्र पार पडले.

काही अंगणवाड्या अजूनही इमारती नादुरुस्त आहेत.तातडीने दुरुस्तीची गरज आहे. लहान मुलांना डिजिटल शिक्षणासाठी एलसीडीची आवश्यकता आहे.

पंधराव्या वित्त आयोगातून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले लवकरात लवकर सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करण्यात आले. सर्व अंगणवाड्यांचे वर्गीकरण, जागा उपलब्धता, भौतिक सुविधा, डिजिटल शिक्षण आणि खेळसाहित्य यावर नियोजन करण्यात येत आहे

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande