पुणे - भाजपचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना जोरदार झटका
पुणे, 20 डिसेंबर, (हिं.स.)। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा धक्का दिला आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज एका विशेष सोहळ्यात अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा पक्षप्रव
पुणे - भाजपचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना जोरदार झटका


पुणे, 20 डिसेंबर, (हिं.स.)। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा धक्का दिला आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज एका विशेष सोहळ्यात अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वडगाव शेरी मतदारसंघातील आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे हे भाजपमध्ये सामील होणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवार गटातील माजी नगरसेवक विकास दांगट, बाळा धनकवडे, माजी नगरसेविका सायली वांजळे आणि रोहिणी चिमटे यांचाही समावेश आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे यांच्यासह काँग्रेस आणि इतर पक्षांतील एकूण बावीस माजी नगरसेवक तथा पदाधिकारी आज भाजपच्या झेंड्याखाली येणार आहेत. हा पक्षप्रवेश पुण्यातील भाजपच्या ऑपरेशन लोटसचा भाग मानला जात आहे. अलीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेतले होते. त्यानंतर आता पुण्यात भाजपने अजित पवार गटातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवले आहे. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी गटांना निवडणुकीपूर्वी मोठा फटका बसला आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande