
दमास्कस, 20 डिसेंबर (हिं.स.)अमेरिकेने सीरियामध्ये हवाई हल्ले केले आहेत. ज्यामध्ये आयसिसशी संबंधित ७० ठिकाणे उद्ध्वस्त केले. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कारवाई सीरियामध्ये तैनात असलेल्या दोन अमेरिकन सैनिक आणि एका अनुवादकाच्या मृत्यूच्या प्रत्युत्तरात करण्यात आली आहे.
या लष्करी कारवाईला 'ऑपरेशन हॉकआय' असे नाव देण्यात आले आहे कारण मारले गेलेले सैनिक अमेरिकेच्या आयोवा राज्यातील होते. ज्याला 'हॉकआय स्टेट' म्हणून ओळखले जाते.
अधिकाऱ्यांच्या मते, या लक्ष्यांमध्ये दहशतवादी अड्डे, शस्त्रास्त्रे साठवण्याच्या सुविधा आणि इतर ठिकाणे समाविष्ट होती. हल्ल्यांवर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले आहे.
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या हल्ल्यांचे वर्णन सूडाची कारवाई म्हणून केले. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले की, ही नवीन युद्धाची सुरुवात नाही तर अमेरिकन सैनिकांना मारणाऱ्यांना दिलेली प्रतिक्रिया आहे. त्यांनी असेही म्हटले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका आपल्या नागरिकांचे रक्षण करण्यापासून कधीही मागे हटणार नाही.
ही संपूर्ण घटना १३ डिसेंबर रोजी सुरू झाली, जेव्हा सीरियामध्ये झालेल्या हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक आणि त्यांच्यासोबत काम करणारा एक स्थानिक अनुवादक मारला गेला.
यानंतर, अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी अनेक लहान कारवाया केल्या, ज्यामध्ये सुमारे २३ लोक मारले गेले किंवा अटक केली गेली. या कारवायांमध्ये, इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून महत्त्वाची माहिती मिळाली, ज्यामुळे हा मोठा हवाई हल्ला झाला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, सीरियामध्ये अमेरिकन सैनिकांच्या हत्येनंतर, अमेरिका आता दहशतवाद्यांवर कडक कारवाई करत आहे. ट्रम्प यांनी सांगितले की. या आठवड्यात मारल्या गेलेल्या शूर सैनिकांचे मृतदेह पूर्ण सन्मानाने अमेरिकेत परत आणण्यात आले आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांचे वचन पूर्ण करून, अमेरिका आता या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना योग्य उत्तर देत आहे. अमेरिकन सैन्य सीरियामध्ये आयसिसच्या ठिकाणांवर हल्ला करत आहे.ट्रम्प यांनी सांगितले की, सीरियाने बऱ्याच काळापासून खूप रक्तपात आणि हिंसाचार पाहिला आहे, पण जर आयसिस पूर्णपणे संपवला गेला तर देशाचे भविष्य उज्ज्वल असू शकते. सीरियन सरकार या कारवाईला पाठिंबा देत आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेकडो अमेरिकन सैन्य अजूनही सीरियामध्ये तैनात आहेत. हे सैन्य अनेक वर्षांपासून आयसिसविरुद्धच्या लढाईत गुंतलेले आहे. २०१४-१५ च्या सुमारास, आयसिसने सीरिया आणि इराकचा मोठा भाग ताब्यात घेतला आणि त्यांची खिलाफत स्थापन केली.
अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी केलेल्या त्यानंतरच्या लष्करी कारवाया आणि त्यानंतर सीरियामध्ये झालेल्या राजवटीत बदलामुळे आयसिसचा बहुतांश प्रदेश गमावला गेला, परंतु या गटाचे उर्वरित लढाऊ अजूनही धोका आहे.
ऑपरेशन हॉकआयचे उद्दिष्ट या उर्वरित दहशतवाद्यांना मोठा धक्का देणे आणि ते अमेरिकेच्या संपर्कात येऊ नयेत याची खात्री करणे आहे. पण हल्ल्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीरियन सरकारच्या गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, १३ डिसेंबर रोजी हल्ला करणारा व्यक्ती त्यांच्या अंतर्गत संरक्षण सेवांशी संबंधित होता.
अमेरिका आणि सीरियन अधिकाऱ्यांनी कबूल केले आहे की, हल्लेखोराचे आयसिसशी थेट संबंध अस्पष्ट आहेत आणि आयसिसने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तरीही, अमेरिकेने हल्ला केलेले लक्ष्य आयसिसशी जोडलेले होते असे म्हटले आहे.
२५ वर्षीय सार्जंट एडगर ब्रायन टोरेस टोवर आणि २९ वर्षीय सार्जंट विल्यम नॅथॅनियल हॉवर्ड अशी ठार झालेल्या अमेरिकन सैनिकांची ओळख पटली आहे. दोघेही आयोवाचे रहिवासी होते आणि आयोवा नॅशनल गार्डमध्ये कार्यरत होते.
अमेरिकन सैन्याच्या म्हणण्यानुसार, सीरियाच्या पालमीरा भागात शत्रूशी झालेल्या चकमकीत ते मारले गेले. या हल्ल्यात आयोवा नॅशनल गार्डचे आणखी तीन सैनिक जखमी झाले आहेत आणि त्यांना उपचारांसाठी बाहेर काढण्यात आले आहे. जॉर्डनसारखे मित्र राष्ट्र देखील या हल्ल्यात अमेरिकेसोबत सामील झाले जेणेकरून ते पुन्हा सैनिकांवर किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांवर हल्ला करू नयेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे