बांगलादेशात हिंदू तरुणाची मारहाण करून हत्या
ढाका , 19 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कट्टरतावादाचे एक अत्यंत भयावह प्रकरण समोर आले आहे. भारतविरोधी निदर्शनांच्या दरम्यान बांगलादेशमध्ये एका हिंदू व्यक्तीची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली आणि
बांगलादेशात हिंदू तरुणाची मारहाण करून हत्या


ढाका , 19 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कट्टरतावादाचे एक अत्यंत भयावह प्रकरण समोर आले आहे. भारतविरोधी निदर्शनांच्या दरम्यान बांगलादेशमध्ये एका हिंदू व्यक्तीची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली आणि त्याला झाडाला बांधून जिवंत जाळण्यात आले. ही घटना बांगलादेशच्या मयमनसिंह येथे घडली. इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपाखाली एका हिंदू व्यक्तीला जमावाने बेदम मारहाण करून ठार मारले.

बांगलादेशी माध्यमांच्या वृत्तानुसार, संतप्त जमावाने 30 वर्षीय दीपु चंद्र दास यांच्या मृतदेहाला आग लावली. उल्लेखनीय बाब म्हणजे, जुलै विद्रोहातील प्रमुख नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या काळातच ही हिंदू युवकाची हत्या झाली आहे. माहितीनुसार, जागतिक अरबी भाषा दिनानिमित्त कारखान्यात आयोजित कार्यक्रमादरम्यान दीपु चंद्र दास यांनी इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा आरोप पसरताच परिसरात तणाव निर्माण झाला आणि संतप्त जमावाने दीपु यांना मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.इतकेच नव्हे, जमावाने मृतदेहाला दोरीने झाडाला बांधले, विविध घोषणा देत त्याला मारहाण केली आणि नंतर आग लावली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची पुष्टी करत भालुका उपजिल्ह्याचे कार्यकारी अधिकारी मोहम्मद फिरोज हुसेन यांनी सांगितले की, प्रेषितांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीची हत्या करण्यात आली असून दास यांचा मृतदेह सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेचा निषेध करत अवामी लीगचे नेते मोहम्मद अली अराफात यांनी म्हटले की, बांगलादेश वेगाने कट्टरतावादाच्या दिशेने जात आहे. दरम्यान, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने या हिंदू व्यक्तीच्या लिंचिंगची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, “नव्या बांगलादेशमध्ये अशा प्रकारच्या हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही.” या गुन्ह्यास जबाबदार असणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत माफी दिली जाणार नाही, असे आश्वासनही सरकारने दिले आहे.यापूर्वी अंतरिम सरकारने एका निवेदनात म्हटले होते,“या कठीण काळात आम्ही प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो की हिंसा,चिथावणी आणि द्वेष नाकारून आणि त्याविरोधात उभे राहून शहीद हादी यांचा सन्मान करावा.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande