सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना पुण्यतिथिनिमित्त अभिवादन
पुणे, 20 डिसेंबर, (हिं.स.)। प्रभावी कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा आणि अस्वछता यांनी बुरसटलेल्या समाजाला जागृत करण्याचे कार्य करणारे थोर आधुनिक संत व समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुण्यतिथीनिमित्त अभिवाद
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना पुण्यतिथिनिमित्त अभिवादन


पुणे, 20 डिसेंबर, (हिं.स.)। प्रभावी कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा आणि अस्वछता यांनी बुरसटलेल्या समाजाला जागृत करण्याचे कार्य करणारे थोर आधुनिक संत व समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्र - कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर आणि संचालक व विभागप्रमुख प्रा. (डॉ.) विलास आढाव यांनी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली अर्पण केली.

याप्रसंगी विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande