ग्लोबल एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मारुती सेलेरियोला तीन-स्टार सेफ्टी रेटिंग
मुंबई, 23 डिसेंबर (हिं.स.)। देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची बजेट हॅचबॅक मारुती सेलेरियो ही भारतीय बाजारात लोकप्रिय कार आहे. आता ग्लोबल एनकॅपने या कारचा क्रॅश टेस्ट अहवाल जाहीर केला असून, सेलेरिओला कमाल तीन-स्टार सेफ्टी रेटिंग
Maruti Celerio


Maruti Celerio


मुंबई, 23 डिसेंबर (हिं.स.)। देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची बजेट हॅचबॅक मारुती सेलेरियो ही भारतीय बाजारात लोकप्रिय कार आहे. आता ग्लोबल एनकॅपने या कारचा क्रॅश टेस्ट अहवाल जाहीर केला असून, सेलेरिओला कमाल तीन-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या क्रॅश टेस्टमध्ये सेफ्टी एजन्सीने कारच्या दोन व्हेरिएंटची चाचणी केली होती. यामध्ये एक ड्युअल एअरबॅग व्हेरिएंट आणि दुसरा सहा एअरबॅग व्हेरिएंट समाविष्ट होता.

ड्युअल एअरबॅग असलेल्या मारुती सेलेरियोला एडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये केवळ दोन-स्टार रेटिंग मिळाली, तर चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये एक-स्टार रेटिंग देण्यात आली. दुसरीकडे, सहा एअरबॅग असलेल्या व्हेरिएंटला एडल्ट सेफ्टीमध्ये तीन-स्टार आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये दोन-स्टार रेटिंग मिळाली आहे. यावरून एअरबॅग्सची संख्या वाढवल्याने सेफ्टीमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे स्पष्ट होते.

एडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन क्रॅश टेस्टमध्ये मारुती सेलेरियोने एकूण 34 पैकी 18.04 गुण मिळवले. फ्रंटल ऑफसेट कोलिजन आणि डिफॉर्मेबल साइड बॅरियर इम्पॅक्ट टेस्टमध्ये पुढील सीटवर बसलेल्या प्रवाशांना चांगल्या ते कमकुवत पातळीपर्यंत संरक्षण मिळाल्याचे ग्लोबल एनकॅपने नमूद केले. मात्र, साइड हेड प्रोटेक्शनच्या कमतरतेमुळे ड्युअल एअरबॅग व्हेरिएंटसाठी पोल इम्पॅक्ट टेस्ट घेण्यात आली नाही. सहा एअरबॅग व्हेरिएंटने मात्र पोल इम्पॅक्ट टेस्टमध्ये चांगल्या ते समाधानकारक स्तराचे संरक्षण दिले.

ग्लोबल एनकॅपच्या अहवालानुसार, अपघातानंतर कारचा फ्रंट फुटवेल आणि बॉडीशेल अस्थिर आढळून आला असून, पुढील भार सहन करण्याची क्षमता मर्यादित असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, ड्युअल एअरबॅग आणि सहा एअरबॅग या दोन्ही व्हेरिएंटना एडल्ट पॅसेंजर प्रोटेक्शनसाठी जवळपास समान गुण मिळाले. मात्र, सहा एअरबॅग व्हेरिएंटने पोल इम्पॅक्ट टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण केल्यामुळे आणि अतिरिक्त एअरबॅग्समुळे त्याला तीन-स्टार रेटिंग देण्यात आली, तर ड्युअल एअरबॅग व्हेरिएंट दोन-स्टारवरच समाधान मानावे लागले.

चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनच्या बाबतीत दोन्ही व्हेरिएंटमध्ये मोठा फरक दिसून आला. सहा एअरबॅग असलेल्या मारुती सेलेरियोला 49 पैकी 18.57 गुण मिळाले असून तिला दोन-स्टार रेटिंग देण्यात आली आहे. त्याउलट, ड्युअल एअरबॅग व्हेरिएंटला केवळ 9.52 गुण मिळाले आणि एक-स्टार रेटिंग मिळाली. ग्लोबल एनकॅपने स्पष्ट केले की, पुढे आणि मागे तोंड असलेल्या चाइल्ड डमीच्या चाचणीत मागील सीटवर बसलेल्या मुलांना अपुरी सुरक्षा मिळाली. समोरून झालेल्या अपघातात कोणताही CRS (Child Restraint System) डोक्याला होणाऱ्या दुखापतीपासून पूर्णपणे संरक्षण देऊ शकला नाही. मात्र, 18 महिन्यांच्या मुलांसाठी मागे तोंड असलेल्या CRS ने साइड इम्पॅक्टमध्ये पूर्ण संरक्षण दिल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ग्लोबल एनकॅपचे सीईओ रिचर्ड वुड्स यांनी या निकालांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, मारुती सुझुकी डिझायर आणि व्हिक्टोरिस सारख्या नव्या मॉडेल्समध्ये फाइव्ह-स्टार सेफ्टी मिळवण्यासाठी कटिबद्ध आहे, ही सकारात्मक बाब आहे. मात्र, काही जुनी मॉडेल्स अद्याप सेफ्टीच्या बाबतीत मागे राहिली आहेत, हे निराशाजनक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande