सनटेक एनर्जीची सचिन तेंडुलकरसोबत दीर्घकालीन भागीदारी
मुंबई, 23 डिसेंबर (हिं.स.)। ट्रुझोन सोलर या प्रमुख ब्रँडतर्गत कार्यरत असलेल्या सनटेक एनर्जी सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडने दिग्गज क्रिकेटपटू, जागतिक क्रीडा क्षेत्रातील आयकॉन आणि कल्याणकारी वृत्तीचे प्रतिक असलेल्या सचिन तेंडुलकर यांच्यासोबत धोरणात्मक
SunTeq Energy Sachin Tendulkar


मुंबई, 23 डिसेंबर (हिं.स.)। ट्रुझोन सोलर या प्रमुख ब्रँडतर्गत कार्यरत असलेल्या सनटेक एनर्जी सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडने दिग्गज क्रिकेटपटू, जागतिक क्रीडा क्षेत्रातील आयकॉन आणि कल्याणकारी वृत्तीचे प्रतिक असलेल्या सचिन तेंडुलकर यांच्यासोबत धोरणात्मक गुंतवणूक तसेच दीर्घकालीन भागीदारीची महत्वपूर्ण घोषणा केली आहे.

सचिन तेंडुलकर बरोबरील ही ऐतिहासिक भागीदारी ट्रुझोन सोलरच्या विकासाच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. येत्या २०३० पर्यंत भारतात आघाडीच्या तीन सोलर ईपीसी कंपन्यांमध्ये स्थान मिळविण्याची कंपनीची महत्त्वाकांक्षा असून या भागीदारीमुळे या महत्त्वाकांक्षेला बळकटी मिळाली आहे. विश्वास, दर्जेदार कामगिरी आणि राष्ट्रीय अभिमानाचे मूर्तिमंत उदाहरण असलेले तेंडुलकर यांच्याशी केलेल्या सहकार्यामुळे ट्रुझोन सोलरच्या ब्रँड विश्वासार्हतेला नवीन उंची प्राप्त झाली आहे, तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छ-ऊर्जा कंपनीच्या दिशेने वाटचालीला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे.

तेंडुलकर यांच्या या धोरणात्मक गुंतवणूकीमुळे ट्रुझोन सोलरच्या आगामी विस्तारात विविध योजनांची अंमलबजावणी करण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे. तसेच कामकाजात पायाभूत सुविधा वाढण्याबरोबरच सौर मूल्य साखळीमध्ये कंपनीची वितरण प्रणाली आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. कंपनी तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटकमध्ये आपली स्थिती आणखी बळकट करणार आहे, तर उत्तरप्रदेश, तामिळनाडू, ओडिसा आणि केरळ यासारख्या उच्च-क्षमतेच्या बाजारपेठांमध्ये अधिक वेगाने विस्तार करण्यावर भर देणार आहे.

या भागीदारीबद्दल भाष्य करताना ट्रुझोन सोलरचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक चारुगुंडला भवानी सुरेश म्हणाले, “सचिन तेंडुलकर यांच्यासोबतची ही भागीदारी केवळ एक गुंतवणूक नसून तिला त्यापेक्षाही अधिक मूल्य आहे. ही भागीदारी म्हणजे आमची मूल्ये, प्रशासन आणि दूरदृष्टीला लाभलेले एक शक्तिशाली पाठबळ आहे. ग्राहकांचा विश्वास वृध्दींगत करणारा त्याचबरोबर विस्तारत जाणारा आणि भविष्यासाठी सज्ज असा सौर ऊर्जा उद्योग उभारण्याच्या आमच्या वचनबद्धतेला ट्रुझोन सोलरवर तेंडुलकर यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे बळकटी मिळालेली आहे. भारतातील घरांना, व्यवसायांना आणि उद्योगांना स्वच्छ ऊर्जापुरवठा हा प्रमुख आणि उपयुक्त पर्याय बनवण्याचे ध्येय आम्ही या भागीदारीतून आखलेले आहे.’’

ट्रुझॉन सोलार ही कंपनी निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक (C&I), तसेच मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे आणि सौरऊर्जा विकास प्रकल्प उभारणीपासून ते ऊजानिर्मिती ते वापर या संपुर्ण जीवनचक्राची जबाबदारी घेत संपूर्ण सौरऊर्जा योजनाच प्रदान करते.

युटिलिटी-स्केल ईपीसी प्रकल्प, छतावरील सौरऊर्जा प्रणाली, पीएम-कुसुम कृषी सौर कार्यक्रम, औद्योगिक सीएसजी प्रकल्प आणि सर्वसमावेशक संचालन व देखभाल सेवा आदी घटक कंपनी सध्या एकत्रितरित्या पुरविते.

उत्कृष्ट कामगिरी, ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि देशभरात वाढता विस्तार यामुळे ट्रुझोन सोलरने गुणवत्ता, विश्वासार्हता आणि दीर्घकालीन परिणाम या घटकांवर लक्ष केंद्रित करत आगळेवेगळे सौर ऊर्जा व्यासपीठ तयार केले आहे. सचिन तेंडुलकर यांच्यासोबतच्या भागीदारीमुळे भागधारकांचा कंपनीवरील विश्वास आणखी वृध्दींगत होणार आहे, तसेच धोरणात्मक सहकार्यासाठी नवनवीन संधीही उपलब्ध होतील आणि भारतात वेगाने विकसित होत असलेल्या अक्षय ऊर्जा परिसंस्थेमध्ये कंपनीची आघाडीचे स्थान अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे.

लाखो ग्रामीण आणि शहरी ग्राहकांना सौरऊर्जेकडे वळण्यासाठी सक्षम करताना भारताच्या अक्षय ऊर्जा ध्येयांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणे आणि त्याव्दारे भावी पिढ्यांसाठी एक स्वच्छ, उज्वल आणि आत्मनिर्भर भविष्य निर्माण करणे, हा या भागीदारीमागील दीर्घकालीन दृष्टीकोन आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande