
मुंबई, 23 डिसेंबर (हिं.स.)। ख्रिसमस व वर्षअखेरीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर व्होल्टास लिमिटेड आणि व्होल्टास बेको यांनी ‘स्मार्ट कम्फर्ट’ ख्रिसमस ऑफर्स लाँच करत ग्राहकांच्या आनंदात अधिक भर घातली आहे. भारतातील आघाडीचा एअर-कंडिशनिंग ब्रँड असलेल्या व्होल्टासने आपल्या होम अप्लायन्सेस संयुक्त उपक्रम व्होल्टास बेकोसोबत मिळून एअर कंडिशनर्स आणि घरगुती उपकरणांवर आकर्षक सणासुदी ऑफर्स सादर केल्या आहेत. या ऑफर्स ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वैध असून, आधुनिक राहणीमान अधिक किफायतशीर आणि सोयीस्कर बनवण्याच्या उद्देशाने त्या डिझाइन करण्यात आल्या आहेत.
या विशेष मोहिमेत ग्राहकांना ऊर्जा-कार्यक्षम एअर कंडिशनर्स, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, मायक्रोवेव्ह ओव्हन्स आणि डिशवॉशर्ससारख्या अत्याधुनिक उपकरणांवर सुलभ फायनान्सिंग पर्याय, स्थिर ईएमआय योजना आणि कॅशबॅक ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. निवडक मॉडेल्सवर फक्त १,०८८ रुपयांपासून सुरू होणाऱ्या फिक्स्ड ईएमआयचा पर्याय उपलब्ध असून, बजाज फायनान्ससोबत ट्रिपल झीरो स्कीमअंतर्गत व्याज, प्रक्रिया शुल्क किंवा डाऊन पेमेंटची आवश्यकता नाही. यासोबतच झीरो किंवा कमी डाऊन पेमेंट योजना, सुमारे १८ महिन्यांपर्यंतच्या दीर्घकालीन फायनान्स स्कीम्स आणि अतिरिक्त कॅशबॅक ऑफर्स देण्यात येत आहेत.
व्होल्टास एअर कंडिशनर्सच्या खरेदीवर सुमारे ६,००० रुपयांपर्यंत कॅशबॅकचा आनंद घेऊ शकतात, व्होल्टास बेकोच्या घरगुती उपकरणांवर जवळपास ८,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर आहे. यूपीआय-आधारित व्यवहारांवर अतिरिक्त प्रोत्साहन देण्यात येत असल्याने खरेदीचा अनुभव अधिक सुलभ आणि फायदेशीर ठरणार आहे. या ऑफर्समुळे ग्राहकांना किफायतशीर दरात प्रीमियम दर्जाची उत्पादने घेण्याची संधी मिळणार आहे.
यासंदर्भात व्होल्टास लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर मुकुंदन मेनन म्हणाले की, ख्रिसमस हा कुटुंबांसोबत आनंद साजरा करण्याचा सण असून, घर हेच त्या आनंदाचे केंद्र असते. आजच्या ग्राहकांना फक्त सणापुरताच नव्हे तर दीर्घकाळ टिकणारा आराम, ऊर्जा कार्यक्षमता आणि स्मार्ट तंत्रज्ञान हवे असते. ‘स्मार्ट कम्फर्ट’ ख्रिसमस ऑफर्सद्वारे आम्ही कुटुंबांना विश्वासाने घर अपग्रेड करण्याची संधी देत आहोत आणि अर्थपूर्ण बचतींसह प्रीमियम उपकरणे अधिक सुलभ करत आहोत.
या सणासुदीच्या ऑफर्स भारतभरातील व्होल्टास ब्रँड शॉप्स, अधिकृत डिलर्स आणि प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असून, अधिकृत वेबसाइट्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरून ऑनलाइन खरेदीचीही सुविधा देण्यात आली आहे. ऊर्जा कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि उच्च कामगिरीवर भर देत व्होल्टास आणि व्होल्टास बेको भारतीय कुटुंबांच्या विश्वासार्ह नाविन्यपूर्ण गरजांची पूर्तता करत असून, विस्तृत सर्व्हिस नेटवर्क आणि ग्राहक-केंद्रित दृष्टीकोनातून आपले स्थान अधिक भक्कम करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule