
छत्रपती संभाजीनगर, 23 डिसेंबर (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर शहरातील टाटा मोटर्स येथे नवीन टाटा सियारा कारचे भव्य लॉन्चिंग सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी बोलताना पालकमंत्री शिरसाट म्हणाले की,
टाटा कंपनीचे सर्वच प्रॉडक्ट्स नेहमी दर्जेदार, विश्वासार्ह व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असतात. विशेषतः टाटा कार्स सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्कृष्ट असून ग्राहकांचा विश्वास जपणाऱ्या आहेत.
टाटा समूहाने नेहमीच गुणवत्ता, सुरक्षितता व नवकल्पनांवर भर देत भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. यासोबतच देशाच्या आर्थिक व औद्योगिक प्रगतीमध्ये टाटा ग्रुपचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis