नीरज चोप्रा यांनी पत्नी हिमानीसह घेतली पंतप्रधांची भेट
नवी दिल्ली , 23 डिसेंबर (हिं.स.)।दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा यांनी मंगळवारी (दि.२३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. या वेळी नीरज यांच्यासोबत त्यांची पत्नी हिमानी मोरही उपस्थित होत्या. नीरज यांनी या
नीरज चोप्रा यांनी पत्नी हिमानी मोरसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट


नवी दिल्ली , 23 डिसेंबर (हिं.स.)।दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा यांनी मंगळवारी (दि.२३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. या वेळी नीरज यांच्यासोबत त्यांची पत्नी हिमानी मोरही उपस्थित होत्या. नीरज यांनी याच वर्षी माजी टेनिस खेळाडू हिमानी मोर यांच्याशी विवाह केला असून, सध्या ते विश्रांतीवर आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर नीरज यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले. त्यांनी लिहिले, “आज सात, लोक कल्याण मार्ग येथे नीरज चोप्रा आणि त्यांच्या पत्नी हिमानी मोर यांच्याशी भेट झाली. या वेळी क्रीडासह विविध विषयांवर चर्चा झाली.”

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने यंदा अखेर ९० मीटरची अडथळा पार करण्यात यश मिळवले. मात्र, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपले विजेतेपद कायम राखण्यात त्याला अपयश आले. दोहा डायमंड लीगमध्ये नीरजने भालाफेकीतील मानक मानली जाणारी ९० मीटरची कामगिरी साध्य केली. त्याने ९०.२३ मीटर अंतरावर भाला फेकत आशियातील तिसरा आणि एकूण २५वा खेळाडू होण्याचा मान मिळवला. मात्र, याच वर्षी टोकियो येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पदक न मिळाल्याने त्याला निराशाही पदरी पडली.

यंदा नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग, गोल्डन स्पाइक मीट आणि एनसी क्लासिक अशा तीन मोठ्या स्पर्धांचे विजेतेपद पटकावले. देशांतर्गत प्रेक्षक आणि कुटुंबीयांसमोर एनसी क्लासिकच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या स्पर्धेचे आयोजन करण्याचे त्याचे स्वप्न साकार झाले. मात्र, डायमंड लीग फायनलमध्ये त्याला समाधानकारक यश मिळाले नाही आणि जर्मनीच्या जुलियन वेबरनंतर तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. सप्टेंबरमध्ये टोकियो येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वात अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. या स्पर्धेत चोप्रा केवळ ८४.०३ मीटरपर्यंत भाला फेकू शकला आणि एकूण आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande