लातूर - भरधाव कारचालकाने दुचाकी उडविल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
लातूर, 24 डिसेंबर (हिं.स.)अहमदपूर या शहरातुन नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर नेहमीच अपघाताचे दृश्य पहायला मिळत असून अहमदपूर शहरातून नांदेडकडे बाहेर जाणा-या मरशिवणी वळणावर भरधाव कारचालकाने दुचाकी उडविल्याने दुचाकी स्वार रोहित अरुण ठाकूर या
लातूर - भरधाव कारचालकाने दुचाकी उडविल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू


लातूर, 24 डिसेंबर (हिं.स.)अहमदपूर या शहरातुन नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर नेहमीच अपघाताचे दृश्य पहायला मिळत असून अहमदपूर शहरातून नांदेडकडे बाहेर जाणा-या मरशिवणी वळणावर भरधाव कारचालकाने दुचाकी उडविल्याने दुचाकी स्वार रोहित अरुण ठाकूर याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर वेगात येणारी कार वाहन क्रमांक एमएच १०-एए ६५७२ या क्रमांकाच्या कार चालकाने अहमदपूर नांदेड- लातूर जाणा-या बायपासवर दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपतघातात अहमदपूरचा रहिवासी असलेला रोहित अरुण ठाकूर वय वर्ष ३२ जागीच ठार झाला.

या नवतरुण युवकाचा मृतदेह तात्काळ ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे खाजगी वाहनाने नेण्यात आला .सदरील अहमदपूरच्या बायपासवर नेहमीच अपघात होत असल्याने शासनाने किंवा राष्ट्रीय महामार्गावरील व्यवस्थापणाने योग्य ती खबरदारी घेऊन धोक्याच्या वळणावर अपघात न होण्यासाठी दक्षता घेणे किंवा उपाययोजना करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गावर येणारी वेगवान वाहने व अहमदपूर शहरातून बाहेर बायपासला येणारी वेगवान वाहने यातून नेहमीच हे अपघात घडत आहेत. या ठिकाणी १०० मीटर अंतरापर्यंत छोटेसे गतीरोधक तयार करून अपघात होऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षा यंत्रणेने दक्षता घेणे खूप गरजेचे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande