कोरोना आंदोलनप्रकरणी नितेश राणेंसह भाजप नेत्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
सिंधुदुर्ग, 24 डिसेंबर (हिं.स.)। कोरोना कालावधीत झालेल्या एका आंदोलनप्रकरणी कुडाळ न्यायालयाने भाजपच्या तीन प्रमुख नेत्यांना चांगलाच दणका दिला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह आमदार प्रवीण दरेकर आण
BJP leaders


सिंधुदुर्ग, 24 डिसेंबर (हिं.स.)। कोरोना कालावधीत झालेल्या एका आंदोलनप्रकरणी कुडाळ न्यायालयाने भाजपच्या तीन प्रमुख नेत्यांना चांगलाच दणका दिला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधात कुडाळ न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.

26 जून 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आंदोलनप्रकरणात आमदार निलेश राणे, राजन तेली यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि इतर 42 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी आमदार निलेश राणे, राजन तेली तसेच अन्य काही आरोपी न्यायालयात उपस्थित होते. मात्र, मंत्री नितेश राणे यांच्यासह पाच आरोपी गैरहजर राहिले. नितेश राणे हे याआधीही वारंवार न्यायालयाच्या तारखांना अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.या सुनावणीदरम्यान नितेश राणे यांच्या वतीने वकिलांनी अनुपस्थितीबाबत सादर केलेला विनंती अर्ज न्यायालयाने फेटाळला. सतत गैरहजर राहण्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले. तसेच संविधान बचाव आंदोलनप्रकरणी आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधातही अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande