रत्नागिरी : चिपळूणमध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे गोपालक शेतकऱ्यांची आढावा बैठक
रत्नागिरी, 24 डिसेंबर, (हिं. स.) : सातत्याने बदलणारे वातावरण, रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणारे आजार व शेतीवरील वाढते खर्च लक्षात घेता विश्व हिंदू परिषद उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या गोरक्षा आयामतर्फे चिपळूण येथे गोपालक व शेतकऱ्यांस
विहिंप गोरक्षा बैठक


रत्नागिरी, 24 डिसेंबर, (हिं. स.) : सातत्याने बदलणारे वातावरण, रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणारे आजार व शेतीवरील वाढते खर्च लक्षात घेता विश्व हिंदू परिषद उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या गोरक्षा आयामतर्फे चिपळूण येथे गोपालक व शेतकऱ्यांसाठी आढावा बैठक घेण्यात आली.

बैठकीस विहिंपचे क्षेत्रीय गोरक्षा प्रमुख भाऊराव कुदळे व कोकण प्रांत गोरक्षा आयाम प्रमुख गणेशजी परब उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रत्नागिरी जिल्हा गोरक्षा आयाम प्रमुख अनिकेत अनिल बापट यांच्या पंचगव्य निसर्गोपचार केंद्रात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला गोरक्षक, गोपालक, गोआधारित शेती करणारे शेतकरी तसेच गोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा मंत्री किरण पेंडसे यांनी केले. अनिकेत बापट यांनी कोकणगिड्ड पंचगव्य उत्पादने भेट देऊन मान्यवरांचे स्वागत केले.

श्री. कुदळे यांनी आपल्या ओघवत्या व प्रभावी भाषणातून गोआधारित विषमुक्त शेतीची आजची गरज, गोरक्षा आयामाचे जिल्ह्यातील कार्य अधिक सक्षम कसे करावे, शालेय वयोगटातील मुलांमध्ये गोमातेविषयी जनजागृती कशी वाढवावी, तसेच समाजात गोमहात्म्य कसे रुजवावे याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांनी विविध प्रश्न समजून घेतले. तसेच कोकणातील गोमाता, शेतकरी व त्यांच्याशी संबंधित अडचणींवर सखोल चर्चा केली. यावेळी श्री. गणेशजी परब यांनीही आपले विचार मांडले.

बैठकीदरम्यान यावर्षीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या दिनदर्शिकेतील प्रत्येक पानावर गोमातेचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, गोरक्षा विषयक कायदे यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, विषमुक्त शेती करू इच्छिणारे किंवा टेरेस गार्डनिंग करणाऱ्यांसाठी देशी गाईच्या ताकापासून तयार केलेले ‘गोकृपा अमृत कल्चर’ अनिकेत बापट यांच्याकडे विनामूल्य उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. जास्तीत जास्त शेतकरी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८८१६४३९५९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande