अंबाजोगाईत शाळेच्या मागील बाजूस लागलेली आग आटोक्यात
बीड, 24 डिसेंबर (हिं.स.)। अंबाजोगाई शहरातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेच्या मागीला बाजूस मोठी आग लागली होती . आग मोठी भडकण्याची चिन्हे होती परंतु अग्निशामक दलाने वेळीच कारवाई करून ही आग आटोक्यात आणली आणि अनर्थ टळलेला आहे. अंबाजोगाई शहरातील छत
अंबाजोगाईत शाळेच्या मागील बाजूस लागलेली आग आटोक्यात


बीड, 24 डिसेंबर (हिं.स.)। अंबाजोगाई शहरातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेच्या मागीला बाजूस मोठी आग लागली होती . आग मोठी भडकण्याची चिन्हे होती परंतु अग्निशामक दलाने वेळीच कारवाई करून ही आग आटोक्यात आणली आणि अनर्थ टळलेला आहे.

अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मागील बाजूस अचानक आग लागली. परिसरात दाट झाडी आणि सुकलेला पालापाचोळा असल्याने आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले. धुराचे लोट आणि ज्वाळा दिसताच परिसरात खळबळ उडाली.

स्वच्छता निरीक्षक यांनी प्रसंगावधान राखून अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. शाळेच्या मागे सुकलेला कचरा आणि झाडे असल्याने आग इमारतीपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती परंतु अनर्थ टळला.

----------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande