पिंपरीतील राजकीय समीकरणे बदलणार; सुतार, भोसले, कलाटे यांचा भाजपात प्रवेश
पुणे, 24 डिसेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तसेच कोथरूडमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना जोरदार धक्का दिला. माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्यासह येरवड्यातील माजी नगरसेवक संजय भोसले यांनी आज पुण
bjp


पुणे, 24 डिसेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तसेच कोथरूडमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना जोरदार धक्का दिला. माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्यासह येरवड्यातील माजी नगरसेवक संजय भोसले यांनी आज पुण्यात भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेत वाकड भागाचे प्रतिनिधित्व केलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपने चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसमधील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेतला होता. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन माजी नगरसेवक भाजपने गळाला लावले आहेत. शहर कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत सुतार आणि भोसले यांचे प्रवेश पार पडले.

यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, आमदार भीमराव तापकीर, रवींद्र साळेगावकर, सुशील मेंगडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सुतार यांनी योग्य वेळेवर भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे नमूद केले.

भोसले म्हणाले, ‘काँग्रेस आमच्या जागा आम्हाला सोडत नव्हती, जागेसाठी आम्हाला भीक मागावी लागत असल्याने आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. युतीमध्ये आम्ही भाजपसोबत २५ वर्षे काम केले आहे, भाजप आम्हाला सख्ख्या भावासारखा आहे.’

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande