
लातूर, 24 डिसेंबर (हिं.स.)देवणी तालुक्यातील देवणी आणि कमालवाडी येथील ओढ्याच्या पात्रात श्रमदानातून तालुका कृषि अधिकारी देवणी कार्यालय आणि नरेंद्र महाराज यांच्या सत्संग सेवा समितीच्या एकत्रित श्रमदानातून वनराई बंधारा तयार करण्यात आला.या बंधाऱ्यामुळे वाहणारे पाणी अडवले गेल्याने पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल परिणामी जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल. शेतकऱ्यांना तर तो उपयोगी ठरणार आहेच शिवाय गुरांना देखील पाणी उपलब्ध होईल. वनराई बंधारा तयार करण्यासाठी कृषि विभाग आणि जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांच्या संत्संग सेवा समितीचे गावातील सदस्यांनी सहभागी होत श्रमदान केले.ग्रामीण भागात वनराई बंधारे आवश्यक असून जमिनीत पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. श्रमदानातून बंधारे बांधण्यासाठी ग्रामस्थांचे चांगले योगदान लाभत आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis