लातूर - दिव्यांग कल्याण योजनेनंतर्गत ८२ प्रस्तावांपैकी ७० जणांना मिळाला लाभ
लातूर, 24 डिसेंबर (हिं.स.)दिव्यांग कल्याण विभागामार्फत यापुर्वी दिव्यांग व्यक्तीने सुदृढ व्यक्तीसोबत विवाह केल्यास रूपये ५०,००० एवढे अनुदान देण्यात येत होते व ही योजना विवाहीतांपैकी एक दिव्यांग व दुसरा सुदृढ असल्यास दिव्यांग अव्यंग अशा जोडप्यांना प
लातूर - दिव्यांग कल्याण योजनेनंतर्गत ८२ प्रस्तावांपैकी ७० जणांना मिळाला लाभ


लातूर, 24 डिसेंबर (हिं.स.)दिव्यांग कल्याण विभागामार्फत यापुर्वी दिव्यांग व्यक्तीने सुदृढ व्यक्तीसोबत विवाह केल्यास रूपये ५०,००० एवढे अनुदान देण्यात येत होते व ही योजना विवाहीतांपैकी एक दिव्यांग व दुसरा सुदृढ असल्यास दिव्यांग अव्यंग अशा जोडप्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत होतो. परंतु, यामध्ये आता शासनाने दिव्यांग कल्याण विभाग शासन निर्णय ८ डिसेंबर २०२५ अन्वये सुधारणा करून अनुदानामध्ये भरघोस अशी वाढ केलेली आहे. आता दिव्यांग अव्यंग विवाह १ लाख ५० हजार रूपये तर दिव्यांग-दिव्यांग विवाहास प्रोत्साहन म्हणून २ लाख ५० हजार रूपये देण्यात येणार आहेत. २०२० ते २०२५ या कालावधीत दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहनपर लाभ योजनेनंतर्गत ८२ प्रस्ताव आले होते. यापैकी ७० प्रस्ताव मंजूर झाले तर १२ प्रस्ताव आवश्यक कागदपत्राअभावी नामंजूर करण्यात आले आहेत.

दिव्यांग बांधव-भगिनी या समाजाचा महत्वाचा घटक आहे. विकलांगतेमुळे अनेकदान दिव्यांग वर्ष जणांना इतरांवर अवलंबून रहावे लागते. परंतु, आपल्यातील कौशल्य, गुणवत्तेच्या बाळावर दिव्यांग जण हे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. दरम्यान, दिव्यांग जणांच्या हिमतीला बळ देण्यासाठी शासनस्तरावर विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये महत्वाची योजना म्हणजे दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग नसलेल्या व्यक्तीसोबत विवाह केल्यानंतर ५० हजार रूपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत होता. परंतु, आता आता शासनाने दिव्यांग जणांसाठी सुधारित धोरणानुसार निश्चित केले आहे. आता पूर्वी केवळ दिव्यांग अव्यंग जोडप्याला लाभ मिळत होता आता त्यात वाढ होवून १ लाख ५० हजार रुपये लाभदेण्यात येणार आहे. त्याचबरोबर पूर्वी नसलेले परंतु आता दोन्हीही जोडपे दिव्यांग असतील.शासनाने दिव्यांग कल्याण विभाग शासन निर्णय १८ डिसेंबर २०२५ अन्वये सुधारणा करून अनुदानामध्ये भरघोस अशी वाढ केलेली आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande