मेलबर्न कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, आर्चर दुखापतीमुळे उर्वरित दोन कसोटींना मुकणार
मेलबर्न, २४ डिसेंबर (हिं.स.)ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ‍ॅशेस २०२५-२६ मालिकेतील चौथ्या कसोटी (बॉक्सिंग डे टेस्ट) साठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. इंग्लंडने संघात दोन बदल करण्यात आले आहेत. जखमी
जोफ्रा आर्चर


मेलबर्न, २४ डिसेंबर (हिं.स.)ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ‍ॅशेस २०२५-२६ मालिकेतील चौथ्या कसोटी (बॉक्सिंग डे टेस्ट) साठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे.

इंग्लंडने संघात दोन बदल करण्यात आले आहेत. जखमी जोफ्रा आर्चरच्या जागी वेगवान गोलंदाज गस अ‍ॅटकिन्सनचा समावेश करण्यात आला आहे, तर ऑली पोपच्या जागी जेकब बेथेलला संघातन स्थान देण्यात आले आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, डाव्या बाजूच्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला उर्वरित दौऱ्यात खेळू शकणार नाही. आर्चर पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचा सर्वात प्रभावी गोलंदाज होता. त्याने ८० षटके गोलंदाजी केली आणि नऊ विकेट्स घेतल्या होत्या. त्याची अनुपस्थिती इंग्लंडसाठी मोठा धक्का आहे. विशेषतः इंग्लिश संघाने आधीच मार्क वूडला गमावले आहे आणि मालिकेत ०-३ ने पिछाडीवर आहे. इंग्लंड मेलबर्न कसोटीत त्यांची प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, फलंदाज ऑली पोप खराब फॉर्ममुळे त्रस्त आहे. या दौऱ्यातील सहा डावांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याची सर्वोच्च धावसंख्या पर्थ कसोटीत ४६ होती.

चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा अंतिम संघ: झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), विल जॅक्स, गस अ‍ॅटकिन्सन, ब्रायडन कार्स, जोश टंग

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande