माळेगाव यात्रेतील कुस्ती स्पर्धेत विक्रम घोरपडेने पटकावला माळेगाव केसरीचा मान
नांदेड, 24 डिसेंबर (हिं.स.)। माळेगाव यात्रे निमित्त वीर नागोजी नाईक कुस्ती मैदानात आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील भगतवाडी येथील विक्रम शंकर घोरपडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत माळेगाव केसरीचा मान पटकावला. विजेते विक्रम घोरपडे य
माळेगाव यात्रेतील कुस्ती स्पर्धेत विक्रम घोरपडेने पटकावला माळेगाव केसरीचा मान


नांदेड, 24 डिसेंबर (हिं.स.)। माळेगाव यात्रे निमित्त वीर नागोजी नाईक कुस्ती मैदानात आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील भगतवाडी येथील विक्रम शंकर घोरपडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत माळेगाव केसरीचा मान पटकावला.

विजेते विक्रम घोरपडे यांना रोख ५१ हजार रुपये, मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, गदा व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत आबू चाऊस हे उपविजेते ठरले. त्यांना ५ हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस, हार, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे ४१ हजार रुपयांचे बक्षीस चार मल्लांना विभागून, तर तृतीय क्रमांकाचे ३१ हजार रुपयांचे बक्षीसही चार मल्लांना विभागून देण्यात आले. या सर्व विजेत्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

विक्रम घोरपडे व आबू चाऊस यांच्यातील अंतिम कुस्ती सुमारे एक तास रंगली. दोन्ही मल्लांनी सादर केलेल्या विविध डावपेचांचा आनंद घेण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. ही कुस्ती स्पर्धा लोहा पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे, रोहिदास टेंभुर्णी, मोहन मेहञी, श्रीराम झपाठक, घोडके व शेख रसूल यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम कौशल्य यांनी केले.

____________

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande