पुणे - हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला ११ कोटींचा दंड
पुणे, 24 डिसेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्याच साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी अकरा कोटींचा दंड ठोठावला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षांच्या कारखान्यानेच नियम डावल्यानं प
पुणे - हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला ११ कोटींचा दंड


पुणे, 24 डिसेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्याच साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी अकरा कोटींचा दंड ठोठावला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षांच्या कारखान्यानेच नियम डावल्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत. साखर आयुक्तालयाकडून परवाना मिळण्याआधीच ऊसगाळप सुरू केल्याचा ठपका ठेवत हा दंड ठोठावला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यावर कारवाईने खळबळ उडाली आहे.

शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याशिवाय आणखी काही कारखान्यांनाही दंड ठोठावण्यात आलाय. यात पंढरपूरच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचाही समावेश आहे. या कारखान्याला २ कोटी ३२ लाखांचा तर सांगली जिल्ह्यातल्या रायगाव शुगर अँड पावर या कारखान्याला ४० लाखांचा दंड करण्यात आला आहे.

राज्यात २०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामाला सुरुवात १ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली. ऊस गाळप करण्यासाठी साखर उत्पादकांनी साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना घेणं हे बंधनकारक आहे. माजी सहकारमंत्री असलेले हर्षवर्धन पाटील हे महासंघाचे अध्यक्षच आहेत. असे असताना त्यांच्या कारखान्यानं परवाना न घेताच गाळप हंगाम सुरू कसा केला असा प्रश्न विचारला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande