
लातूर, 24 डिसेंबर (हिं.स.)जळकोट ते तिरुपती या भव्य पदयात्रेचे आयोजन २८ डिसेंबर रोजी करण्यात आले असून, या पदयात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत. ही पदयात्रा ३० दिवसांची असून, २८ जानेवारी रोजी तिरुपती येथे समारोप होणार आहे.
या पदयात्रेदरम्यान भाविक दररोज ३० ते ३५ किलोमीटरचे अंतर पायी पार करणार आहेत. कठोर शिस्त, संयम आणि भक्तीभाव जपत ही वारी निघणार असून, यात सहभागी होणारे भाविक श्री बालाजीच्या दर्शनासाठी आपली श्रद्धा पायी प्रवासातून व्यक्त करणार आहेत.
जळकोट येथून गेल्या ११ वर्षांपासून सातत्याने ही पदयात्रा आयोजित करण्यात येत आहे. जळकोट येथील श्री बालाजीचे निस्सीम भक्त यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी ही पदयात्रा निघते. यंदा या पदयात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. वाटेत विविध ठिकाणी स्थानिक भाविकांकडून पदयात्रेचे स्वागत, भोजन व विश्रांतीची व्यवस्था करण्यात येते.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis