
लातूर, 24 डिसेंबर, (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२५ रोजी लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये आदेश निर्गमित केले आहेत.
त्यानुसार निवडणूक क्षेत्रात व निवडणुकीवर प्रभाव पडणाऱ्या लगतच्या ग्रामीण क्षेत्रात निवडणूकीच्या प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत आदी ठिकाणांच्या संबंधित जागा मालकाच्या परवानगीशिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय प्रचारासाठी वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. हे आदेश दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis