
छत्रपती संभाजीनगर, 24 डिसेंबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातून
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असल्याचे दिसते. मनसेचा राज्य उपाध्यक्ष राहिलेला मनसेला रामराम करत शिंदे सेनेत प्रवेश करत राहिला तर शिवसेना ठाकरेंचा महानगर प्रमुख ठाकरेंना सोडचिट्टी देत राजू वैद्य भाजपमध्ये गेले आहेत.
राज ठाकरे उद्धव ठाकरे एकीकडे एकत्रित आले असले तरी या दोन नेत्यांच्या पक्षातील प्रमुख पद असलेल्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. राज ठाकरे यांनी राज्य उपाध्यक्ष बनवलेला पदाधिकारी सुमित खांबेकर शिंदेंच्या शिवसेनेत गेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील महानगर प्रमुख असलेले राजू वैद्य हे भाजपमध्ये गेले आहेत, तर मनसेचे सुरडकर आणि गौडा पाटील हे भाजपमध्ये गेले आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाला गळती लागली असल्याचे दिसून येते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis