सोलापूर - मनपा निवडणूक २०२५ : १०७४ नामनिर्देशन अर्जांची विक्री
सोलापूर, 24 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन अर्ज विक्री प्रक्रियेला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार महानगरपालिका प्रशासनामा
Nsos


सोलापूर, 24 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन अर्ज विक्री प्रक्रियेला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार महानगरपालिका प्रशासनामार्फत नियोजित वेळापत्रकानुसार नामनिर्देशन अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून, केवळ अर्ज विक्री करण्यात आली. मात्र, आज एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झालेला नाही.

निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय अर्ज विक्रीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे — निर्णय अधिकारी १ : १६७, निर्णय अधिकारी २ : १९२, निर्णय अधिकारी ३ : १३०, निर्णय अधिकारी ४ : १२०, निर्णय अधिकारी ५ : १७१, निर्णय अधिकारी ६ : १२६ आणि निर्णय अधिकारी ७ : १६८. अशा प्रकारे एकूण १०७४ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत असून, आगामी दिवसांत अर्ज दाखल करण्यास गती येण्याची शक्यता आहे. उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज भरताना मा. राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदर्श आचारसंहिता व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. तसेच आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) व इतर अनिवार्य कागदपत्रांची पूर्तता करून विहित कालमर्यादेत अर्ज सादर करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे, छाननी, अर्ज माघार, तसेच मतदान प्रक्रिया ही सर्व टप्पे आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राबविण्यात येणार असून, याबाबतची सविस्तर माहिती वेळोवेळी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर व सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाणार आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande